वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथे लोकसहभागातून सुरु करण्यात आलेल्या २५ बेडच्या आयसोलोशन केंद्रास उमरगा येथील उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी शुक्रवारी (दि.३०) भेट देऊन मार्गदर्शन केले व समाधान व्यक्त केले. तसेच गावात आणखी कडक लाँकडाऊन करा अश्या सुचना दिल्या. या आयसोलोशन केंद्रास शासनाकडून मदत करू असे सांगितले. यावेळी तहसीलदार संतोष रूईकर,गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे,सरपंच तथा कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष विठ्ठल साठे, उपसरपंच तथा उपाध्यक्ष वामन भोरे, दादासाहेब मुळे, पंडित ढोणे, सुभाष आळंगे, अँड. दादासाहेब जानकर, संजय साठे, शिवाजी साठे, उमेश कडले, ओमकार साठे, गोपाळ ढोणे, बाळू कांबळे, अच्युत चिकुंद्रे, अभिमन्यु कुसळकर, सरदार मुजावर, अनिकेत पत्रिके, मंडळ अधिकारी साळुंखे साहेब, तलाठी व्हि. व्हि. मणियार,डॉ. संतोष मनाळे, विकास भोरे, रणजित साठे, मनोज राजपूत, जीवन कांबळे आदी उपस्थित होते.
सध्या माकणी येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी गावातील मेडिकल, दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळले तर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. यास नागरिकांनी प्रतिसाद देऊन प्रशासनाच्या नियमांचे पालन करून आवश्यक ती काळजी घेतल्यास हळू हळू ही संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.