Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे लसीकरणाबाबत घरोघरी जाऊन जनजागृती – नागरिकांना लस घेण्याचे केले आवाहन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी यासाठी शुक्रवारी (दि.२५) घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली. तसेच लसीकरणाबाबत महत्व पटवून देणारे माहितीपत्रक वाटण्यात आले.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे रुग्ण संख्या वाढत चालली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सदस्या शितल राहुल पाटील, ग्रामपंचायत सास्तुर यांच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक लस घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तरीही अनेक ठिकाणी लसीकरणास म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सास्तुर गावातील नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी व नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन करण्यासाठी सास्तुरच्या जिल्हा परिषद सदस्या शितल राहुल पाटील, माजी जि प सदस्य राहुल पाटील, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, सास्तुरचे सरपंच यशवंत कासार यांच्यावतीने एक माहितीपत्रक काढण्यात आले आहे. या माहितीपत्रकात लसीकरणाबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे. गावातील १८ वर्षापुढील नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) घरोघरी जाऊन आवाहन करण्यात आले.\"\"गावातील एकूण ५ वार्ड साठी ५ टीम तयार करण्यात आल्या. या टीमने वार्ड मधील प्रत्येक घरी जाऊन लसीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच माहितीपत्रक देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शितल राहुल पाटील, राहुल काकासाहेब पाटील सरपंच यशवंत कासार, ग्राप सदस्य छाया पवार, मयुरी चिमुकले, सात्तपा चिवरे, सतीश यादव, फझल कादरी, राहुल औसेकर, ग्रामसेवक डी. आय. गोरे, ग्रा.प कर्मचारी बाबू सुतार, जैनू कोतवाल, नयेश्वर कांबळे, आशा कार्यकर्ती आदींनी परिश्रम घेतले.

Ad 2
Ad 1
Tags: आवाहनलसीकरण जनजागृती
Previous Post

झी मराठी प्रस्तुत ‘सारेगमप लिटिल चॅम्पस’ च्या रिअॅलिटी शोमध्ये घुमणार सोलापूरी आवाज – नव्या पर्वास 24 जूनपासून झाली सुरवात

Next Post

उमेद – माझी उपजीविका समृद्धी मोहीम अंतर्गत सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

उमेद - माझी उपजीविका समृद्धी मोहीम अंतर्गत सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!