Vartadoot
Sunday, July 26, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील होळी शिवारात वीज पडून दोन जनावरे दगावली

admin by admin
02/10/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील होळी शिवारात शुक्रवारी ( दि. १) सायंकाळी ५.३० च्या सुमारास झालेल्या पावसात वीज कोसळून दोन जनावरे दगावल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की लोहारा तालुक्यातील होळी व परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसात वीज कोसळून शेतामध्ये झाडाला बांधलेल्या दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक गाय व एक म्हैस यांचा समावेश आहे. शेतातील सोयाबीन काढण्यासाठी सदरील शेतकरी आपल्या शेतात गेले होते. इतर वेळी ते दुसर्‍यांच्या शेतामध्ये मोलमजुरी करतात. भुकंपामध्ये घरकर्त्या सासऱ्याच्या मृत्यूमुळे बालाजी उर्फ धर्मा जमादार हे आपली सासुरवाडी होळी येथेच स्थायिक झाले आहेत. मोलमजुरी करून ते आपल्या जनावरांसह आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्यावर मोठे नैसर्गिक संकट कोसळले आहे.
तरी या संकटातून त्यांना सावरण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करुन त्याना या दु:खातुन बाहेर पडण्यासाठी शासनाने मदत करावी अशी मागणी होळी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यावेळी सरपंच सरोजा बिराजदार, ग्रामपंचायत सदस्य केशव सरवदे, संजय मनाळे, प्रदीप मोरे, करण बाबळसुरे, दादा बिराजदार, लक्ष्मण राठोड यांनी तात्काळ तलाठी, मंडल अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी सास्तुर यांच्याशी संपर्क करुन सदरील घटनेची माहिती देऊन पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एच. व्ही. जगताप, सहाय्यक एन. बी. मनोहर, तलाठी एस. एल. कोणे यांनी शनिवारी (दि.२) सकाळी पंचनामा केला आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

१९९३ च्या भूकंपातील मृतांना सामूहिक श्रद्धांजली

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने तालुका विधी सेवा समिती लोहारा यांच्यामार्फत प्रभात फेरी संपन्न

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने तालुका विधी सेवा समिती लोहारा यांच्यामार्फत प्रभात फेरी संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's