Wednesday, October 14, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा नगरपंचायत कार्यालयासमोर नगरसेवकाचे उपोषण – कार्यालयाकडून लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील विंधन विहिरीचे रखडलेले काम तात्काळ करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी नगरसेवक प्रशांत काळे यांनी मंगळवारी (दि.५) सकाळी नगरपंचायत कार्यालयाच्या गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर विंधन विहिरीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल याबाबत नगरपंचायतीच्या वतीने दुपारच्या सुमारास लेखी पत्र दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक क्रमांक ४ मधील विंधन विहिरीचे रखडलेले काम तात्काळ करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी नगरसेवक प्रशांत काळे यांनी मंगळवारी (दि.५) सकाळी नगरपंचायत कार्यालयाच्या गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले. त्यांनी सोमवारी (दि.४) नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग ४ मध्ये आमदार निधीतून २ ठिकाणी विंधन विहिरी मंजूर झाल्या आहेत. हे काम करण्यासाठी आपल्या कार्यालयाकडून कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.

\"\"

परंतु संबंधित ठेकेदाराने हे काम अद्याप सुरू केले नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे इतर स्रोत उपलब्ध नसल्याने प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. त्यामुळे मी हे आमरण उपोषण करत असल्याचे या निवेदनात म्हटले होते. नगरसेवक काळे यांनी मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास हे उपोषण सुरू केले. त्यानंतर नगरपंचायत कार्यालयाने नगरसेवक काळे यांना लेखी पत्र दिले. त्यात म्हणले आहे की, आपल्या प्रभागातील विंधन विहिरी घेण्यासाठी चा कार्यारंभ आदेश संबंधित कंत्राटदाराला यापूर्वीच दिला आहे. परंतु सदर कंत्राटदाराने अद्यापपर्यंत विंधन विहिरीचे कामे केलेली नाहीत. त्यामुळे या कंत्राटदारास कार्यालयाकडून नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतर हे कामे लवकरात लवकर करण्यात येतील असे कंत्राटदाराने कार्यालयास कळविले आहे. त्यामुळे आपण हे उपोषण मागे घेऊन सहकार्य करावे असे लेखी पत्र दिल्यानंतर हे नगरसेवक प्रशांत काळे यांनी हे उपोषण मागे घेतले आहे. यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, स्वच्छता निरीक्षक अभिजित गोरे, अभिमान खराडे, अमोल बिराजदार, नगरसेवक विजय ढगे, आरिफ खानापुरे, दिपक मुळे, के. डी. पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.

Tags: आमरण उपोषणनगरपंचायतपाणीपुरवठालोहारा
Previous Post

लोहारा तालुक्यातील भोसगा येथील विद्यार्थ्यांनी शाळेत बनवले सिड बॉल

Next Post

दि. १३ जुलै ला होणार आरक्षण सोडत – २५ जिल्हा परिषद व २८४ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

दि. १३ जुलै ला होणार आरक्षण सोडत - २५ जिल्हा परिषद व २८४ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!