Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांच्या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार – आज दुपारी तीन पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या उर्वरित ४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून या चार जागांसाठी २२ जण रिंगणात आहेत. सोमवारी ( दि.१०) दुपारी तीन पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. त्यामुळे आज दुपारी या चार जागांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
लोहारा नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या प्रभागाची निवडणूक स्थगित केली. त्यामुळे लोहारा नगरपंचायत निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या चार प्रभागाची वगळता उर्वरित १३ प्रभागातील निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर उर्वरित चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्याप्रमाणे २९ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत उमेदवारांकडून वेबसाईटवर नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. एकूण उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ४ जानेवारी ला प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी करून वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात दाखल ४५ पैकी २३ उमेदवारी अर्ज अवैध झाले. त्यामुळे छाननी नंतर चार जागांसाठी २२उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ८ मध्ये ३७३ मतदार आहेत. या ठिकाणी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्षा ज्योती दिपक मुळे तर शिवसेनेकडून सारिका प्रमोद बंगले नशीब आजमावत आहेत. तसेच अपक्ष म्हणून राधाबाई अजित घोडके, वर्षाराणी विनोद लांडगे, संगीता गुरपद स्वामी निवडणुक लढवित आहेत. प्रभाग क्र. १० मध्ये ४८५ मतदार आहेत. या ठिकाणी शिवसेनेकडून अविनाश बळीराम माळी, काँग्रेसकडून विजयकुमार भानुदास ढगे तसेच अपक्ष म्हणून रियाज खडीवाले, कल्याण ढगे, विरेंद्र नरुणे, श्यामसुंदर नारायणकर, अतिउल्लाखान पठाण, दयानंद स्वामी निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्र. १६ मध्ये ३६२ मतदार आहेत. याठिकाणी काँग्रेसकडून आरिफ खानापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून असिफ बागवान तसेच अपक्ष उमेदवार महेबूबपाशा सुंबेकर हे निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्र. १७ मध्ये ५११ मतदार आहेत. या ठिकाणी शिवसेनेकडून आरती ओम कोरे, काँग्रेसकडून निर्मला शिवलिंगय्या स्वामी तसेच अपक्ष म्हणून हानिफाबी महेबूब गवंडी, शितल संदीप माळी, छबन संबय्या स्वामी, देवश्री भरत सुतार निवडणूक लढवत आहेत.\"\"या चार जागांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त होती. त्यामुळे आपल्या पक्षाची अधिकृत उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. त्यामुळे पक्षाची उमेदवारी न मिळालेले इच्छुक अपक्षाचा झेंडा हाती घेऊन निवडणूक रिंगणात उतरले. आज सोमवारी (दि. १०) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे पक्षातील नाराजांनी दाखल केलेले अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी त्या त्या पक्षातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यामुळे या जागांच्या निवडणुकीचे चित्र आज दुपारी स्पष्ट होईल.
या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन आघाडी केली आहे. तर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत आहे. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यामुळे या चार जागेच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार फिल्डिंग लावण्याची शक्यता आहे. या चार जागांसाठी दि. १८ जानेवारीला मतदान पार पडल्यानंतर दि. १९ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीदरम्यान पुन्हा एकदा राजकीय पक्षांकडून प्रचारयंत्रणा राबविली जाईल. त्यामुळे लोहारा शहरात पुन्हा एकदा राजकीय दंगल पाहायला मिळणार आहे.

Ad 2
Ad 1
Tags: लोहारा नगरपंचायत निवडणूक
Previous Post

कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे जिल्हावासीयांना आवाहन

Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात – उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ जणांची माघार

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात - उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ जणांची माघार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!