वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शासनाने महिलांच्या समस्या सोडवाव्यात असे प्रतिपादन सरपंच सुनिता पावशेरे यांनी केले. उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे आयोजित महिला सभेत त्या बोलत होत्या.
उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे आदर्श सरपंच सुनिता पावशेरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरूवातीला सरपंच सुनिता पावशेरे यांनी सभेत कार्य आढावा सादर केला. या सभेस उपस्थित सर्व महिलांनी सरपंच सुनिता पावशेरे यांच्या कार्यकाळातील विविध योजना व कार्याचे समाधान व्यक्त करत टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी सभेत उपस्थित महिलांनी विविध प्रश्न मांडले. विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, एकल, जेष्ठ, निराधार महिलांना शासनाने विविध योजनेतून त्वरीत मानधन चालू करावे, गॅस दरवाढ कमी करावी अन्यथा तहसील कार्यालयावर लवकरच निषेध मोर्चा काढण्यात येईल असा ठराव घेवून इशारा देण्यात आला. या सभेत महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली. अध्यक्षपदी शकिलाबी मुल्ला, उपाध्यक्षपदी रेखा गायकवाड, तर सचिव म्हणून पल्लवी पाटील यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. सरपंच सुनिता पावशेरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महिला सभेच्या सचिव म्हणून रसिका ढोणे यांनी काम पाहिले.
यावेळी युवती, महिलांच्या विविध समस्या, बचतगट लघुउद्योग, घरकुल योजना, महिला आरोग्य यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सभेस ग्रा.पं.सदस्या छाया भालेराव, मंगल दळवे, अंगणवाडी कार्यकर्ती पदमीन डोणगावे, लता बलसुरे, पल्लवी डोणगावे, जयश्री बिराजदार, निशा घोटमाळे, वैष्णवी पाटील, सुरेखा घोटमाळे, कोतवाल यशोदा गायकवाड, आशा वर्कर सुनिता पाटील, कमाबाई यलोरे, भामाबाई आलमले, सुमनबाई आलमले, मिनाबाई आलमले, आकाशवाणी चिंचोले, मुक्ताबाई मुसांडे, अनिता बिराजदार, अलका पाटील, रुपाली पाटील, सोनाली चिंचोले, जयश्री पावशेरे, प्रतिक्षा घोटमाळे, मंगल स्वामी, उमादेवी स्वामी, मुल्ला, अनुसया ईटकर, चिमनाबाई जाधव, सुमन भोसले, अंबिका बिराजदार, प्रभावती बिराजदार,
सुनिता चिंचोले, कोंडाबाई चिंचोले, शामल नंदगावे, कल्पना आलमले, अश्विनी साळुंखे, हिरा चौधरी, विश्रांतबाई जामगे, कमल यलोरे हायात मुल्ला, सरस्वती जकेकुरे, रेखा जकेकुरे, राधिका साळुंखे, विठाबाई डोणगावे, सरुबाई जकेकुरे, घंटे योगिता भोसले, अल्का बिराजदार, सरवदे रेखा गायकवाड, सखुबाई, डोणगावे, मीना आलमले, अश्विनी घंटे, आसावरी पावशेरे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.