Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शिक्षणाशिवाय समाजाचे परिवर्तन अशक्य – डॉ. प्रतापसिंग राजपूत

admin by admin
16/01/2023
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क – उस्मानाबाद / सुमित झिंगाडे
समाजात सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधण्यासाठी इथला गरीब, वंचित माणूस शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलाच पाहिजे. संविधान तयार करताना उपेक्षितांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या हेतू त्याकाळी डॉ. आंबेडकरांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. शिक्षणाशिवाय समाजाचे परिवर्तन अशक्य आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी केले.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, भूगोल विभाग व श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने विद्यापीठ नामाविस्तार दिन, जागतिक भूगोल दिन व मकर संक्रांत याचे औचित्य साधून आयोजित व्याख्यानात ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचारातील योगदान ‘ या विषयावर सोमवारी (दि.१६) रोजी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. शिला स्वामी, डॉ. संध्या डांगे, डॉ. अरूण बावा आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ. राजपूत म्हणाले की, विद्यापीठ नामाविस्तार दिनाचा पूर्वइतिहास सांगताना सर्वांनी जातीय दृष्टीकोन बदलून शैक्षणिक मतप्रवाह बदलणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन होईल. यासाठी राजकीय लोकशाहीचे रुपांतर सामाजिक व आर्थिक दृष्टीकोनातून करणे आवश्यक आहे. नामांतराचा इतिहास सर्वांनी वाचून तो समजून घेतला पाहिजे असे ते शेवटी म्हणाले.

व्याख्यान
अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य अशोक सपाटे म्हणाले की, तरुणांनी सर्वगुण संपन्न बनण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन स्वतःचा विकास साधावा. सध्या विद्यार्थ्यांसमोर विविध आव्हाने उभी असताना आपण स्वतःला काळानुरूप बदलले पाहिजे. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. सतिश शेळके, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. किरण राजपूत, डॉ. सुजित मटकरी, प्रा. नागनाथ बनसोडे, डॉ. राजू शेख, प्रा. अशोक बावगे, सकाळ यिनचे महाविद्यालयीन अध्यक्ष अमोल कटके आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुशिल मठपती यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राम बजगिरे यांनी तर डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी आभार मानले. यावेळी विविध शाखेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्यातील ४ गावात वेळ अमावस्या साजरी

Next Post

शिवसेना कुणाची ? आज होणार निवडणूक आयोगासमोर सुनावणी !

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

शिवसेना कुणाची ? आज होणार निवडणूक आयोगासमोर सुनावणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's