वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवसंपर्क मोहिमेअंतर्गत लोहारा तालुक्यातील सात ठिकाणी युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. या दरम्यान आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीची सुरुवात करण्यात आली आहे.शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात ११ ते २४ जुलै दरम्यान शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत आहे. माजी खासदार रवींद्र गायकवाड, खा. ओमराजे निंबाळकर, आ. ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली व युवानेते किरण गायकवाड यांच्या शुभहस्ते युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील एकोंडी, राजेगाव, होळी, रेबे चिंचोली, मुर्शदपुर, धानुरी,आनंदनगर तांडा खेड या सात ठिकाणी युवासेना शाखांचे उद्घघाटन करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन या अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी युवानेते किरण गायकवाड यांनी शिवसैनिक व युवासैनिकांना मार्गदर्शन केले. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर संघटनात्मक बांधणीची सुरुवात या माध्यमातुन करण्यात आली. ठाकरे सरकारच्या काळातील कार्य, योजना, कोरोना काळातील शिवसेनेचे कार्य, पिकविमा, पिक कर्जाबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यास तत्पर राहावे असे आवाहन किरण गायकवाड यांनी केले. युवासैनिकांनी सामान्य नागरीकांना येणाऱ्या कोणत्याही अडचणी सोडवण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी केले. यावेळी संघटनात्मक पक्षबांधणी, शाखाप्रमुख, सचिव , संघटक, कोषाध्यक्ष, सोशलमिडीयाप्रमुख यांच्या नियुक्त्या, पदाधिकारी यांच्या अडीअडचणी यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उदतपुरच्या सरपंच रंजना बालाजी पवार, उपसरपंच दगडु दलाल, ग्रा.पं.सदस्य किसन बनसोडे, तुकाराम पवार यांचा शिवसेनेत प्रवेश घेण्यात आला. तसेच सास्तुर येथे शिवसंपर्क अभियाना अंतर्गत बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे, माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना विधानसभा अध्यक्ष शरद पवार, विभागप्रमुख बालेपीर शेख, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, राजेगावचे सरपंच सुरेश देशमुख, कास्तीचे परवेझ तांबोळी, होळीचे माजी सरपंच व्यंकट माळी, मुर्शदपुर शालेय शिक्षण अध्यक्ष अनिल बलसुरे, महेबुब फकिर, महादेव धारोळे, सचिन देशमुख, मुरलीधर पवार, बाजार समिती संचालक आनंदराव सुर्यवंशी, उप तालुका प्रमुख प्रदिप मोरे, अविनाश राठोड, बालाजी मडुळे, आबा पुरणे, राजाभाऊ मोरे, दत्ता मोरे, प्रेम लांडगे, नितिन जाधव, युवासेना शाखाप्रमुख करण बाबळसुरे, विशाल सुरवसे, आकाश जाधव, शेखर पाटिल, दत्ता जाधव, अतुल मोरे, शिवराम सुरवसे यासह युवासेना, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.