वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दि. 21 मे रोजी ४५ वर्षांच्या वरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. याकरीता जिल्ह्यामध्ये 36 निवडक आरोग्य उपकेंद्र, 1 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ ग्रामीण रुग्णालय, 3 उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद आणि पोलीस रुग्णालय उस्मानाबाद याठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या दिवशी केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना केवळ कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. लस घेण्याकरिता लाभार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी किंवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑन स्पॉट नोंदणी पद्धतीने क्रमाने लस दिली जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.
लोहारा तालुक्यातील 6 लसीकरण केंद्र खालीलप्रमाणे –
ग्रामीण रुग्णालय लोहारा,
ग्रामीण रुग्णालय सास्तुर,
आरोग्य उपकेंद्र – भातागळी, हिप्परगा (रवा), धानुरी, तोरंबा
वरील प्रत्येक लसीकरण केंद्रावर 150 लस उपलब्ध राहणार आहे.