Wednesday, October 28, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

शेतकऱ्याने मागितली गांजा लागवड करण्याची परवानगी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या शेती बिनभरवशाची झाल्याचे बहुतांश शेतकरी सांगतात. परंतु ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांचा संसार शेतीवरच अवलंबून आहे. परंतु शेती करताना येणाऱ्या अडचणीने त्रस्त झालेल्या लोहारा तालुक्यातील मार्डी येथील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून गांजा लागवडीस परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.

\"\"
लोहारा तालुक्यातील मार्डी येथील युवा शेतकरी महेश वसंतराव कदम याने दि. १७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना विनंती अर्ज सादर करून गांजा लागवडीस परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. या अर्जात त्याने म्हणले आहे की, मी बिगरपाण्याची शेती करणारा शेतकरी असून निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी मला पाण्याची गरज आहे. म्हणून मी पोकरा योजनेत अर्ज दाखल केला. पण ते म्हणाले की, अगोदर स्वतः जवळील भांडवल / पैसे भरा आणि मग अनुदान मिळवा. म्हणून मी सोयाबीन पिकास चांगला दर आहे म्हणून त्याची निवड केली. सोयाबीन चांगलं पिकलं पण सोयाबीन चा दर १२ हजार रुपये क्विंटल वरून ५ ते ६ हजारावर घसरले. यामुळे आता माझ्याकडे भांडवल शिल्लक राहिले नाही. कारण काढणी, भरडणी, खुरपणी, मशागत आदीचा खर्च वजा जाता शेतकऱ्याला काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकरी फाशी घेतो किंवा सावकारी कर्ज काढून शेत करतो पण मी तसे करणार नाही. कारण मी एक युवा शेतकरी आहे.\"\"त्यामुळे सोयाबीनला प्रती क्विंटल दहा हजार रुपये भाव द्यावा किंवा गांजा / अफू लागवडीची परवानगी द्या अशी मागणी महेश कदम या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या विनंती अर्जात केली आहे. पुढे महेश कदम याने म्हणले आहे की, असे केल्याशिवाय शेती करणे परवडणार नाही. हा अर्ज वाचून योग्य तो न्याय करा नाहीतर न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल आणि शेतकरी फाशी घेईल नाहीतर गांजा लागवड करेल असेही या अर्जात नमूद केले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: शेतकरी
Previous Post

लोहारा शहरात पोलिसांचे पथसंचलन – नागरिकांना केले आवाहन

Next Post

लोहारा (खु) येथील आरोग्य वर्धिनी केंद्र ठरले १०० टक्के पात्र नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे तालुक्यातील दुसरे आरोग्य वर्धिनी केंद्र

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

Next Post

लोहारा (खु) येथील आरोग्य वर्धिनी केंद्र ठरले १०० टक्के पात्र नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे तालुक्यातील दुसरे आरोग्य वर्धिनी केंद्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!