Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शैक्षणिक संस्था या एखादया कुटुंबासारख्या असतात – बसवराज पाटील

admin by admin
03/10/2022
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

मुरूम, ता. उमरगा :
संस्थेतील कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होऊ शकतात. परंतु त्यांनी कामाच्या माध्यमातून जी प्रतिमा तयार केली आहे. त्यातून ते कधीच सेवानिवृत्त होऊ शकत नाहीत. जी माणसे चांगला विचार करून सेवाभावीवृत्तीने कार्य करतात आणि सतत कार्यमग्न राहतात. त्यांचे व्यक्तिमत्व इतरांना निश्चितच आदर्शवत राहू शकते. माणसांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये असणारे चांगले गुण हे इतरांना निश्चितच दिशादर्शक ठरतात. या संस्थेने चांगली माणसे निवडल्यामुळेच संस्थेची तर उंची वाढतेच परंतु विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे नावही होते. माझे व प्रवीण गायकवाड यांच्या वडिलांचे मैत्रीपूर्ण व जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. अशा शैक्षणिक संस्था या एखाद्या कुटुंबासारख्याच असतात असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.
मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहातमध्ये आयोजित प्रतिभा निकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्कार सोहळा सोमवारी (दि. ३) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष रामकिशन मालपाणी, सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, आष्टा कासारचे शिवकुमार स्वामी गुरुजी, प्रकाश आळंगे, आप्पाराव अल्लीसे, बाबुराव कांबळे, विठ्ठलसाई कारखान्याचे संचालक माणिकराव राठोड, डॉ. सतिश शेळके, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, डॉ. श्रीराम पेठकर, उपप्राचार्य सुधीर अंबर, सत्कारमूर्ती प्रवीण गायकवाड व त्यांच्या पत्नी प्राजक्ता गायकवाड आदींची उपस्थिती होती.


पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, या शैक्षणिक संस्थेत काम करण्याची गायकवाड सरांना संधी मिळाल्याने आणि सेवानिवृत्तीच्या सत्काराप्रसंगी चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार होणे म्हणजे त्यांच्या जीवनाला एक प्रकारची ऊर्जा मिळणे होय. याप्रसंगी शरण पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, प्रवीण गायकवाड सरांनी या संस्थेमध्ये जे काम केले आहे. ते काम निश्चितच चांगले असून ते वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असतील परंतु आमच्या संस्थेच्या परिवारातून ते सेवानिवृत्त होणार नाहीत. यापुढेही त्यांनी अशीच जबाबदारी घेऊन कार्यतत्पर राहावे याकरिता त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्राचार्य दिलीप गरुड यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना प्रवीण गायकवाड म्हणाले की, संस्थेने माझ्यावर जी जबाबदारी व विश्वास टाकला तो मी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब गंगावणे (उस्मानाबाद), किरण गायकवाड, आनंद कांबळे, आर. जी. गायकवाड, राहूल वाघ, वैभव कांबळे, आर. एन. सोनवणे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अशोक सपाटे यांनी केले. सूत्रसंचालन उल्हास घुरघुरे तर आभार डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी मानले. यावेळी शहर व परिसरातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार – राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Next Post

चोरीच्या ३ मोबाईल फोनसह ४ आरोपी ताब्यात

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

चोरीच्या ३ मोबाईल फोनसह ४ आरोपी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's