Vartadoot
Saturday, June 14, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीसाठी शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सदर करावेत

admin by admin
05/11/2022
in ब्रेकिंग
A A
0
Ad 10

लातूर :- लातूर पाटबंधारे विभाग क्र. 1 विभागा अंतर्गत मांजरा प्रकल्प, तेरणा प्रकल्प, तावरजा प्रकल्प, मसलगा प्रकल्प व 33 टक्केपेक्षा जास्त जिवंत पाणीसाठा उपलब्ध असलेले लघु प्रकल्प, साठवण तलाव व बॅरेजेस आदी प्रकल्पातील पिण्यासाठी आवश्यक आरक्षित पाणीसाठा वगळता उर्वरित पाणी सिंचनासाठी देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत संबंधित पाटबंधारे विभागाच्या शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय, विभागीय कार्यालयात पाणी मागणी अर्ज सादर करावेत, असे लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

प्रकल्पातील पाणीसाठा व प्रकल्पीय पिकरचना व प्रकल्पनिहाय देण्यात येणाऱ्या पाणीपाळीची माहिती संबंधित शाखा कार्यालयात पाहावयास मिळेल. सर्व लाभधारकांनी पाणी अर्ज नमुना 7 व 7 अ शासनाने सुधारित केलेल्या नमुन्यात संबंधित शाखा अधिकारी यांचे कार्यालयात पाणी अर्ज भरुण शाखा कार्यालय किंवा बीटप्रमुखाकडे सादर करावेत. तसेच कमी पाण्यात येणारे रब्बी हंगामी ज्वारी, हरभरा व इतर उभी पिके व लाभक्षेत्रातील प्रवाही वरील उभा ऊस (हंगामी मंजूर) कालावधी 15 ऑक्टोबर 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 हा राहील. तसेच केवळ कालव्याच्या पाण्यावर विसंबून न राहता विहीर व बोरचा आधार असल्यासच जास्त पाण्याची गरज असणारी पिके घ्यावीत. अन्यथा होणाऱ्या संभाव्य नुकसानीस जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही, याची नोंद घेवून जलसंपदा विभागास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लातूर पाटबंधारे विभाग क्रं.1 लातूर अंतर्गत प्रत्येक शाखा कार्यालयातील रिक्त पदांची संख्या लक्षात घेवून लाभधारकांनी स्वतः पुढाकार घेवून शाखेत किंवा उपविभाग, विभागीय कार्यालयात येवून सिंचनासाठी पाणी मागणी करावी. तसेच शक्य असल्यास शाखेतील ग्रामपंचायत कार्यलयात प्रत्याक्षात पाणी मागणी अर्ज उपलब्ध करुण देण्याचे नियोजन करण्यात येईल.

पाणी अर्जासोबत सातबारा उतारा सादर करावा. मागील थकबाकी पूर्ण भरावी व रितसर पावती घ्यावी. पाणी मागणी क्षेत्र 0. 20 आरच्या पटीत (कमीत कमी 0.20 आर क्षेत्र) असावे. तसेच अर्जासोबत थकीत पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी अर्ज मंजूर करण्यात येईल. पाणी अर्ज मंजूर झाल्यानंतर पिकास पाणी घ्यावे. आपआपल्या हद्दीतिल शेतचाऱ्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित बागायतदाराची राहील. शेतचारी नादुरुस्त असल्यास मंजुरी दिली जाणार नाही व पाणी दिले जाणार नाही. मंजुरीपेक्षा जास्त क्षेत्र सिंचीत केल्यास हंगामी दराच्या दीडपट दराने आकारणी केली जाईल. पाणी अर्ज न देता पाणी घेतल्यास बिनअर्जी क्षेत्राचे पंचनामे करुन दंडनीय दराने आकारणी करण्यात येईल.

कालव्यावरील उपसा सिंचन परवानाधारकाने त्यांचे मंजूर क्षेत्रास ठरवून दिलेल्या तारखेस पाणी कालव्याच्या शेवटपासून ते सुरवात याप्रमाणे घ्यावे. सिंचन नियोजन असल्यास मंजूर कालावधी सोडून कृषीपंप चालू ठेवल्यास सिंचन अधिनियम 1976 चे कलम 97 नुसार विद्युत पुरवठा खंडीत करणे, विद्युत मोटारी जप्त करणे, पाणीपरवाना रद्द करणे, व बिगर पाळी पंचनामा करण्यात येईल. शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या प्रचलीत पाणीपट्टीच्या दराने आकारणी करण्यात येईल व त्यावर 20 टक्के स्थानीक कर आकारला जाईल.

नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा काही अपरिहार्य कारणामुळे अथवा तांत्रिक कारणास्तव पाणीपुरवठा शक्य न झाल्यास व त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर राहणार नाही.

काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणी उदभवल्यास या जाहीर निवेदनाद्वारे देण्यात आलेल्या पाणी पाळीच्या नियोजनामध्ये बदल करण्याचे हक्क लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी राखून ठेवले आहेत. उपसा सिंचन परवानाधारकांनी इतरांना पाणी दिल्यास व दिलेला सिंचन परवान्यावर विद्युत मोटार 5 एचपीपेक्षा जास्त विद्युत मोटार एचपी आढळल्यास सिंचन परवाना रद्द करण्यात येईल. जबरदस्तीने अथवा विनापरवानगी गेट उघडल्यास, कालवा फोडून पाणी घेतल्यास पाटबंधारे अधिनियम 1976 चे खंड क पोटकलम क व ख अन्वये दंडात्मक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

कालव्यावरील उपसा व ठिबक सिंचन पाणी परवानाधारकांचे पाणी अर्ज प्रथम प्राधान्याने मंजूर करून एकपट दरानेच अकारणी करण्यात येईल. तसेच ज्या लाभधारकांचे पाणी परवाने उपलब्ध नाहीत, त्या लाभधारकांस विनापरवाना व अनाधिकृत पाणी उपसा समजून संबधितास दिडपट दराने अकारणी करण्यात येईल. त्यामुळे कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त लाभधारकांनी पाणी परवाने घेवूनच सिंचनासाठी पाणी घ्यावे व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता रो. सु. जगताप यांनी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

विमा रकमेच्या उर्वरित वसुलीसाठी आमदार कैलास पाटील यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट, संपत्तीचा शोध सुरू..

Next Post

व्हाटस्अ‍ॅपकडून नवीन फिचर्स सादर, युजर्सचा होणार मोठा फायदा….

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला
आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

04/02/2025
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन
ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

14/01/2025
लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?
आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

19/12/2024
माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन
आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

03/10/2024
Next Post

व्हाटस्अ‍ॅपकडून नवीन फिचर्स सादर, युजर्सचा होणार मोठा फायदा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

505223

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!