Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 22 छापे – लोहारा तालुक्यासह जिल्हाभरात २२ व्यक्तिविरोधात गुन्हे दाखल

by admin
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन काल सोमवार दि. 17.10.2022 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 22 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 50 लि. द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर 417 लि. गावठी दारु, व देशी दारुच्या 201 बाटल्या व 88 लि. शिंदी अंमली द्रव असे मद्य जप्त करण्यात आले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त दारु यांची एकत्रीत किंमत 52,590 ₹ आहे. यावरुन 22 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 22 गुन्हे खालीलप्रमाणे दाखल करण्यात आले आहेत.
1) बेंबळी पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. यात डिकमल पारधी पिढी ग्रामस्थ- अनिता भोसले या 13.00 वा. सु. केशेगाव शिवारातील धारुर रस्त्यालगत 70 लि. शिंदी हा अंमली द्रव बाळगलेल्या, तर ताकविकी ग्रामस्थ- अंजली पवार या 13.30 वा. सु. गावातील तोरंबा फाटा रस्त्यालगत देशी दारुच्या 17 सिलबंद बाटल्या बाळगलेल्या असताना पथकास आढळल्या.
2) मुरुम पो.ठा. च्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले. यात आष्टाकासार लमाण तांडा येथील- अनिता जाधव या 11.40 वा. सु. तांड्यावरील पाण्याच्या टाकीजवळ 24 लि. गावठी दारु बाळगलेल्या, तर बलसुर येथील- शिवराम सरवदे हे 12.10 वा. सु. कडदोरा गावात 24 लि. गावठी दारु बाळगलेले, तर शास्त्रीनगर तांडा येथील- दादाराव राठोड हे 15.50 वा. सु. तांडा परिसरात 25 लि. गावठी दारु बाळगलेले असताना पथकास आढळले.
3) ढोकी पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. यात दत्तनगर पारधी पिढी, ढोकी येथील- कालीदास शिंदे हे 16.40 वा. सु. पिढीवरील राहत्या घरासमोर 70 लि. गावठी दारु बाळगलेले, तर भंडारवाडी येथील- शरद गुरव हे 17.40 वा. सु. गाव शिवारातील एका ढाब्यामागे देशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या व 80 लि. गावठी दारु बाळगलेले असताना पथकास आढळले.
4) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकले. यात उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. हद्दीत वडगांव ग्रामस्थ- सुरेश पवार हे 13.10 वा. सु. येडशी येथील गणेश हॉटेलसमोर देशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या व 25 लि. गावठी दारु बाळगलेले, तर येरमाळा पो.ठा. हद्दीत शेलगाव फाटा येथील- लताबाई काळे या 14.10 राहत्या परिसरात पत्रा शेडजवळ देशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या व 30 लि. गावठी दारु बाळगलेल्या, तसेच वाशी पो.ठा. हद्दीत सरमकुंडी येथील- अमोल पाटील हे 17.30 वा. सु. गाव शिवारातील संकेत हॉटेलमागे देशी दारुच्या 48 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना पथकास आढळले. यावरुन त्यांच्या विरुध्द उस्मानाबाद (ग्रा.), येरमाळा व वाशी पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.
5) लोहारा पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. यात नागराळ येथील- रमेश गोरे हे 13.30 वा. सु. उमरगा येथील कदम कॉम्प्लेक्समागे 18 लि. शिंदी हा अंमली द्रव बाळगलेले, तर नागुर येथील- शाहुराज
सोनवणे हे 17.30 वा. सु. गावातील आपल्या घरासमोर देशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना पथकास आढळले.
6) तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. यात वेताळनगर, तुळजापूर येथील- रविंद्र कसबे हे 19.05 वा. सु. तडवळा शिवारातील हॉटेल देवराज धाबा येथे देशी दारुच्या 41 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर काक्रंबा येथील- राजेंद्र झाडे हे 20.35 वा. सु. गावातील धारुर रस्त्यालगत 30 लि. गावठी दारु बाळगलेले असताना पथकास आढळले.
7) वाशी पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. यात पारधी पिढी, गोलेगाव येथील- लक्ष्मण काळे या 17.30 वा. सु. गावातील आपल्या पत्रा शेडसमोर 20 लि. गावठी दारु बाळगलेले, तर विजोरा येथील- अमर खोसे हे 19.00 वा. सु. गाव शिवारातील शिवबा हॉटेलसमोर देशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना पथकास आढळले.
8) भुम पो.ठा. च्या पथकास लक्ष्मीनगर, भुम येथील- संगीता काळे या 12.20 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला 50 लि. द्रव पदार्थ व 10 लि. गावठी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.
9) येरमाळा पो.ठा. च्या पथकास येरमाळा येथील- अरुण बारकुल हे 13.00 वा. सु. येरमाळा बस स्थानकासमोर देशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.
10) अंबी पो.ठा. च्या पथकास शेळगाव, ता. परंडा येथील- वसंत कोडांने हे 18.00 वा. सु. गावातील एका हॉटेलजवळ देशी दारुच्या 20 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.
11) उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास अंबेहोळ येथील- सुजित गायकवाड हे 16.50 वा. सु. गावातील आपल्या किराणा दुकानाजवळ 09 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
12) शिराढोन पो.ठा. च्या पथकास लोहटा (पुर्व), ता. कळंब येथील- केसरबाई पवार या 21.30 वा. सु. आपल्या घरासमोर 10 लि. गावठी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.
13) उमरगा पो.ठा. च्या पथकास पळसगाव तांडा, ता. उमरगा येथील- संजय राठोड हे 17.15 वा. सु. तांड्यावरील आपल्या घरासमोर 60 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

Ad 2
Ad 1
Tags: मद्यविरोधी विशेष मोहीम
Previous Post

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची ज्युनिअर आयएएस परीक्षेत यश – स्कुलच्या वतीने करण्यात आला विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

दक्षिण जेवळी येथील युवकांचे उपोषण दुसऱ्या दिवशी मागे

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

दक्षिण जेवळी येथील युवकांचे उपोषण दुसऱ्या दिवशी मागे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!