प्रतिनिधी / लोहारा
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबादचे सरचिटणीस माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित भानुदासराव चव्हाण महाविद्यालय लोहारा, जि. उस्मानाबाद यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद चे सरचिटणीस माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २६ जानेवारी २०२१ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी खालील पाच विषय देण्यात आले आहेत.
१. आमदार सतीश चव्हाण यांचे मराठवाड्याच्या विकासातील शैक्षणिक व सामाजिक योगदान,
२. covid-१९ नंतरचे बदलते शैक्षणिक धोरण,
३. शेतकरी: आव्हानांचा वाटसरु,
४. राष्ट्रभक्ती: स्वातंत्र्याअगोदरची व नंतरची,
५. महिला सक्षमीकरणाचे वास्तव
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक : रु. ५००१/- , द्वितीय पारितोषिक: रु. ३००१/- , तृतीय पारितोषिक : रु. २००१/- देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे नियम व अटी आहेत.
१. स्पर्धा Google Meet ॲप द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
२. प्रत्येक स्पर्धकास ०७ मिनिटाचा (५+२) वेळ देण्यात येईल.
३. स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुली राहील.
४. या वक्तृत्व स्पर्धेची भाषा मराठी असेल.
५. प्रत्येक महाविद्यालयातून ०२ स्पर्धकांना सहभाग घेता येईल.
६. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावे महाविद्यालयामार्फत प्राचार्यांच्या सही व शिक्याच्या संमती पत्रासह खालील लिंक वर अपलोड करावीत.
७. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे दिनांक २५ जानेवारी २०२१ वार सोमवार सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत खालील लिंक द्वारे नोंदवावीत.
नाव नोंदणीसाठी खालील लिंकचा वापर करावा.
https://forms.gle/4zdZnJc1TdSqocDj7
ही स्पर्धा दि. २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे.