वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील उदतपूर येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून लोहारा ग्रामीण रूग्णालयाला एक लाख किमतीचे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन दिली आहे. सोमवारी (दि.२४) मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालयास सुपूर्त करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेकजण आपापल्या परीने या संकटकाळात मदत करत आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय, कोविड सेंटरलाही मदत करत असल्याचे दिसून येत आहे. अशाच पद्धतीची मदत तालुक्यातील उदतपूर येथील ग्रामस्थांनी केली आहे. गावातील नागरिकांनी लोकवर्गणीतून ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी रक्कम एकत्र करून ही मशीन सोमवारी ( दि.२४) तहसीलदार संतोष रूईकर, स्पर्श रूग्णालयाचे प्रकल्प समन्वयक रमाकांत जोशी यांच्या उपस्थितीत ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक गोविंद साठे यांच्याकडे सुपूर्त केली.

यावेळी गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, डॉ. इरफान शेख, उदतपूरचे माजी सरपंच माधवराव पाटील, गोवर्धन मुसांडे, बालाजी पवार, तुळशीराम पवार, गुंडेराव पवार, किसन बनसोडे, तुकाराम पवार, प्रा. महादेव सोनटक्के यांच्यासह आरोग्य कर्मचारी प्रवीण कांबळे, खंडू शिंदे आदी उपस्थित होते.
No Result
View All Result
error: Content is protected !!