वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोविड १९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा व जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शुक्रवारी (दि.१८) उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात ही आढावा बैठक होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बीड जिल्ह्यातील कोविड १९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा व जिल्हा खरीप हंगाम आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १२.४५ च्या सुमारास उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरवली ( ता. भूम) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी २.४५ च्या सुमारास उस्मानाबाद येथे आगमन होणार असून ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उस्मानाबाद जिल्ह्यातील कोविड १९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा व जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर ४.३० वाजता पत्रकार परिषद होणार असून त्यानंतर त्यांचे सोलापूर विमानतळाकडे प्रयाण होणार आहे.
No Result
View All Result
error: Content is protected !!