Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील धानुरी गावास आमदार ज्ञानराज चौगुले यांची भेट – वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना दिल्या सूचना – धानुरीत ३० बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील धानूरी येथे मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गुरुवारी (दि.१७) धानुरी गावास भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला.
मागील काही दिवसांपासून तालुक्यात अत्यल्प रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे काही प्रमाणात तालुक्याला दिलासा मिळाला होता. बुधवारी आलेल्या अहवालानुसार ती संख्या मोठी असल्याचे दिसून आले. बुधवारी ( दि. १६) प्राप्त अहवालानुसार तालुक्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये ३९ तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये ६ असे एकूण ४५ जण पॉझिटिव्ह आले होते. विशेष म्हणजे ४५ पैकी ३९ जण धानुरी गावातील होते. तसेच मंगळवारी (दि.१५) धानुरी गावात १४ जण पॉझिटिव्ह निघाले होते. सद्यस्थितीत धानुरी गावातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास ९० आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. तेथील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गुरुवारी ( दि. १७) धानुरी गावास भेट दिली. गावातील जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करण्यासाठी आरोग्य विभागाच्या ४ स्वतंत्र टीम नियुक्त करून वार्डनिहाय काम करावे, गावातील अवैध धंदे हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्यानेही रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने अवैध धंदे चालकांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आमदार चौगुले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, विशेषतः लहान बालकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले. तसेच सद्यःस्थितीचा विचार करता येत्या 2 दिवसांत धानुरी गावात ३० बेडचे विलगिकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय यावेळी झाला.\"\"यावेळी युवा नेते किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, बाबुराव शहापूरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, माजी जि. प. सदस्य दीपक जवळगे, प्रा. आनंदराव सूर्यवंशी, सरपंच प्रवीण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटूकणे, ग्रामसेवक जाधव, परमेश्वर साळुंके, संदीपान बनकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
————-
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मागील अनेक दिवस शासनाने कडक निर्बंध लावले होते. सध्या त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे, स्वतःची व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेधानुरी भेट
Previous Post

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या उस्मानाबादमध्ये – जिल्ह्यातील कोविड १९ परिस्थिती व खरीप हंगामाचा घेणार आढावा – दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आढावा बैठक

Next Post

लोहारा तालुक्यात शुक्रवारी 43 रुग्णांची भर – धानुरीत ३० जण पॉझिटिव्ह

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यात शुक्रवारी 43 रुग्णांची भर - धानुरीत ३० जण पॉझिटिव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!