वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत माझी पोषण परसबाग विकसन मोहिमेस उमरगा तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. १५ जून ते १५ जुलै या काळात आयोजित मोहिमेत कुटुंबाचे आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी या उपक्रमाला उमरगा तालुक्यातील बलसुर, कवठा, कुनाळी, आलुर, येणेगुर, दाळिंब, कदेर, तुरोरी, गुंजोटी या प्रभागामधे उमेद अंतर्गत तालुक्यामध्ये 9 प्रभाग संघ असून पोषण परसबाग तयार करण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
तालुक्यातील गर्भवती स्त्री, स्तनदा माता, किशोरवयीन मुली आणि कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्याचा दृष्टीने स्वतःच्या घराच्या बाजूला किंवा शेतामध्ये पोषणमूल्य असणारे अन्न उपलब्ध होणार आहे. तसेच आठवडी बाजारामध्ये जो भाजीपाल्यासाठी होणारा खर्च आहे तो कमी करून घरच्या घरी पिकवलेला विषमुक्त व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पालेभाज्या व फळभाज्या आहारामध्ये दररोज वापरता यावा तसेच रासायनिक खताचा वापर करून पिकवलेल्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे कुटुंबाचे आरोग्य धोक्यात चालले आहे हे लक्षात घेऊन उमेद अभियान अंतर्गत पोषण परसबाग विकसन मोहीमेला सुरुवात करण्यात आली आहे.
उमरगा तालुक्यामध्ये पोषणबाग निर्मितीसाठी गाव पातळीवर कार्यरत असलेले आरोग्य सखी, कृषी सखी, प्रेरिका, बँक सखी व एकूणच उमेदचे सर्व केडर यांचे मोलाचे योगदान आहे.
पोषण परसबाग आखणी त्याचे नियोजन करण्यासाठी उमरगा तालुक्यामध्ये प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर औरादे, सचिन सोनवणे, महेश ढोणे, संतोष राठोड, अभिमन्यू नाईक, भेदन राठोड, सुरज चव्हाण, गोकर्णा सूर्यवंशी, ज्योती सूर्यवंशी आदी परिश्रम घेत आहेत.
No Result
View All Result
error: Content is protected !!