Vartadoot
Monday, July 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व माजी आमदार राहुल मोटे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट – शेतकऱ्यांना पीक विमा मिळेपर्यंत पाठपुरावा करणार – जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी दिली माहिती

admin by admin
27/05/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व माजी आमदार राहुलभैय्या मोटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी ( दि.२५) मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी या मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.
विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई रक्कम अदा केलेली नाही. त्याबाबत राज्य सरकारच्या वतीने कृषी मंत्री दादा भुसे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा म्हणून राज्य सरकारने केलेले नुकसानीचे पंचनामे ग्राह्य धरण्यात यावे असे आदेश पिक विमा कंपन्यांना निर्गमित करुन कळविण्यात आल्याचे सांगितले होते. परंतु अद्याप त्याची विमा कंपनीने दखल घेऊन शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम अदा करण्याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. या बाबींकडे लक्ष वेधून उचित कार्यवाहीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली. याबाबत अजित दादांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांना सुचना केल्या. त्यानंतर माजी आमदार राहुल मोटे व जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांची भेट घेतली. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही तातडीने करून शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली.


ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. नाले, बंधारे तुटून अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बनमी, कडब्याच्या बनमी, फाटासकट वाहून गेल्या होत्या. या नुकसानीची भरपाई म्हणून पीक विम्याची रक्कम मिळणे आवश्यक आहे.


विमा कंपन्या ह्या प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत असल्याने केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन न झाल्यास उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने विमा कंपनी, केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याची देखील तयारी करत असून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी सर्व बाजूंनी लढा उभारून शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम खात्यावर जमा होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उपमुख्यमंत्री अजितदादा पवारउस्मानाबाद जिल्हापीक विमाराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

लोहारा शहरातील नागरिकांना शुध्द पाणी माफक दरात मिळावे यासाठी सुरू केला आरओ प्लांट

Next Post

लोहारा शहरातील प्रभाग चार मध्ये निर्जंतुकीकरण फवारणी – माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका पौर्णिमा लांडगे यांचा पुढाकार

Related Posts

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?
आपला जिल्हा

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

03/07/2026
Next Post

लोहारा शहरातील प्रभाग चार मध्ये निर्जंतुकीकरण फवारणी - माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका पौर्णिमा लांडगे यांचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's