उमरगा –
उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिवस म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सुनिता पावशेरे होत्या.
यावेळी मुख्याध्यापिका रसिका पाटील, शिक्षिका सुनिता पटवारी -कुलकर्णी , कोतवाल यशोदा गायकवाड,अंगणवाडी कार्यकर्त्या रसिका ढोणे, पद्मिन डोणगावे, लता बलसूरे, शिवकांता दळवे, निधाबाई गायकवाड, पल्लवी पाटील, सुनिता सुर्यवंशी, युवती शकुंतला रसाळ, मांडवी दळवे, प्रियंका पावशेरे, आसावरी पावशेरे, विद्या पाटील, साक्षी सुरवसे, वैष्णवी स्वामी, अरुणा भोसले, पल्लवी डोणगावे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
सरपंच सुनिता पावशेरे यांनी आघाडी सरकारने सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन करुन सरकारचे आभार मानले. आणि गावातील मुलींना उच्च शिक्षण घेण्याचे आवाहन केले. माझ्यासह सर्वच महिला सावित्रीबाई मुळेच शिक्षण घेवून विविध क्षेत्रात यशस्वीपणे पुढे जात असल्याचे सांगितले. तसेच या प्रसंगी मांडवी दळवे, विद्या पाटील या युवतींनी सावित्रीबाईवरील गीते गायन करुन मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच मिनाबाई पाटील,ग्रामपंचायत सदस्य छाया भालेराव, किसाबाई डोणगावे, मिरा पाटील,तसेच जयश्री बिराजदार, प्रभावती गायकवाड, संजणा पाटील, सिमाबाई गायकवाड, बबिता सुर्यवंशी, राणी भालेराव, सिद्धार्थ गायकवाड, राजोत्तम गायकवाड, विठ्ठल दासमे, अरविंद दळवे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन आसावरी पावशेरे यांनी केले तर आभार सुनिता सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते देविदास पावशेरे यांनी पुढाकार घेतला.