खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गुरुवारी ( दि. १८) लोहारा तालुक्यात शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोहारा तालुक्यातील मार्डी, बेंडकाळ, लोहारा, लोहारा खु, खेड, माकणी, करजगाव, चिंचोली काटे, सास्तुर, मुर्षदपूर व कोंडजिगड या ठिकाणी भेटी देऊन शेतात जाऊन शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान हा निकष सर्वत्र लागू करून एसडीआरफ आणि एनडीआरएफ अंतर्गत सर्व पंचनामे करण्याबाबत संबंधित अधिकारी यांनी शेतकरी बांधवाना मदत होईल अशी भूमिका ठेवावी. तसेच नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व तहसील कार्यालयात द्यावा व पोहच घ्यावी असे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार संतोष रुईकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, गटविकास अधिकारी शितल खिंडे, माजी जि प सदस्य दिपक जवळगे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, माजी नगरसेवक श्याम नारायणकर, पंडित ढोणे, माकणीचे सरपंच विठ्ठल साठे कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, लोहारा खुर्दचे सरपंच सचिन रसाळ, शेखर पाटील, भगवान मक्तेदार, आप्पासाहेब देवकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.