वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
आशा गटप्रवर्तक संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी तालुक्यातील सालेगाव येथील आशा सुपरवायझर राजश्री साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
उस्मानाबाद येथे आशा गटप्रवर्तक संघटनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी गटप्रवर्तक संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी तालुक्यातील सालेगाव येथील आशा सुपरवायझर राजश्री साळुंके यांची निवड करण्यात आली.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या हस्ते साळुंके यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी दत्ता देशमुख, नवनाथ धुमाळ, सुरेखा ठाकुर यांच्यासह सर्व गतप्रवर्तक उपस्थित होत्या. राजश्री साळुंके यांची तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले जात आहे.