वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
छत्रपती कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या विविध प्रकारच्या मागणी संदर्भात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार आँफीस उस्मानाबाद समोर बुधवारी (दि.२४) एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात पुढील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोरोना बजेट वाटप करणे, विविध योजनेचे बजेट वाढवून देणे, थकित शिष्यवृत्ती व विविध मंजुर योजनेचे बजेट कामगारांना वाटप करणे, रिनीवलसाठी मुदत वाढ देणे, सुरक्षा संच व अत्यावश्यक संच तालुका स्तरावर वाटप करणे, ९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात ग्रामसेवक किंवा संबंधित अधिकारी यांना आदेशीत करणे बाबत, २०१८-१९,२०१९-२० तसेंच२०२०-२१ चे विविध योजनेचे फाँर्म जमा करून घेणे, ऊसतोड कामगार मंडळाची अंमलबजावणी त्वरित करणे आदीबाबत सरकारी कामगार अधिकारी राजपूत सर, काशीद सर, शेंदारकर सर यांना उपस्थित महिला कामगार व पुरुष कामगार ,संघटनेचे प्रदेशअध्यक्ष, प्रदेशउपाध्यक्ष, प्रदेशसचिव तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष बालाजी माटे , प्रदेश सचिव तिम्मा माने, उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष सुनील दाजी जाधव, ग्रामीण समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष श्री अभय कुलकर्णी, लोहारा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय पाटील, तालुका सचिव बालाजी चव्हाण, मोहन कांबळे, उस्मानाबाद जिल्हा महिला उपाध्यक्षा लिंबीका गायकवाड, नेहरू युवा केंद्र सम्नवयक निकीता गायकवाड, वैशाली पाटील, निर्मला पाटील, मिना आरगडे, सुकेशना रसाळ, अनिता मुर्टे, जयश्री मुर्टे, लतिका रसाळ, केशर रसाळ, शालुबाई रसाळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व जनसेवक उपस्थित होते.