वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तब्बल ११०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
लोहारा शहरातील अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने रविवारी (दि.४) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सप्तरंग मंगल कार्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी लहान गट (५ वी ते ८ वी) व मोठा गट ( ९ वी ते १२ वी) असे दोन गट तयार करण्यात आले होते. लहान गटाची परीक्षा स. १० ते ११ तर मोठ्या गटाची परीक्षा दु. १२ ते १ या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत तब्बल ११०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल ११ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे. यावेळी वैजिनाथ पाटील, दयानंद पोतदार, अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, ओम कोरे, प्रमोद बंगले, जगदीश लांडगे, गटशिक्षणाधिकारी भास्कर बेशकराव, केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे, बब्रुवान बादुले आदींनी भेट दिली.
या स्पर्धेसाठी संतोष गिरी, बळी रणशूर, अमित बोराळे, अजित विभूते, दत्ता रोडगे, रमेश काडगावे, आकाश कुरकुले, विजय स्वामी, गणेश विभूते, राहुल बेलकुनीकर, मनोज बादुले, नाना बंगले, शंभू स्वामी, सुशांत माशाळकर, व्यंकटेश पोतदार, सुहास जेवळीकर, अमोल बोराळे, अमोल तिपणे, रामेश्वर काडगावे, यशवंत चंदनशिवे, पंडित खराडे, नागेश ढगे, समाधान मोरे आदींनी परिश्रम घेतले.