वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी यशवंत दादाराव बुरटूकणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच प्रवीण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटूकणे, माजी सरपंच गणेश जाधव, माजी उपसरपंच संभाजी वडजे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राम पाटील, मनोज साळुंखे, बालाजी मुसांडे, अभिमान बनकर, नामदेव रवळे आदी उपस्थित होते.