वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी व देशात राहुल गांधींच्या नेतृत्वाला अधिक सक्षम करण्याकरिता युवकांनी पुढाकार घेऊन अधिक सक्रिय व्हावे असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिवपदी दिलीप भालेराव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि.२९) मुरूम येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिवपदी दिलीप भालेराव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरण पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, लोहारा पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकृष्णपंत खरोसेकर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, उमरगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड. सुभाष राजोळे, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, नगराध्यक्षा अनिता अंबर, प्राचार्य दिलीप गरुड, अशोकराजे सरवदे, जिल्हा परिषद सदस्य धनराज हिरमुखे, दिपक जवळगे, रफिक तांबोळी, डॉ. जीवनगे, विकास हराळकर, महिला काँग्रेस अध्यक्षा संगिता कडगंचे, संगीता पाटील, सुवर्णा भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले की, सध्या महाराष्ट्रातील बदलते राजकारण लक्षात घेऊन येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष ग्रामीण भागात अधिक मजबूत व सक्रिय होणे गरजेचे आहे. पक्षाची ताकत वाढण्यासाठी युवकांनी अधिक संघटीत झाले पाहिजे. देशाचा विकास करण्यासाठी आणि उद्याचे नेतृत्व निर्माण करण्यासाठी पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी ही निवड खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल. यावेळी सत्काराला उत्तर देताना दिलीप भालेराव म्हणाले की, जिल्ह्यातील काँग्रेसची ताकत वाढवून कॉंग्रेस पक्षाला गतवैभव व यश प्राप्तीसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. सदर जबाबदारी दिल्याबद्दल प्रदेश काँग्रेस कमिटीचे त्यांनी यावेळी आभार मानले. या सत्कार कार्यक्रमासाठी उस्मानाबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, दीपक मुळे, जावेद काझी, उपसभापती व्यंकट कोरे, राहुल वाघ,लोहारा युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, प्रभाकर लोंढे, पंकज खरोसेकर आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. शौकत पटेल यांनी तर आभार चंद्रशेखर पवार यांनी मानले.