वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील डाळिंब येथील स्व. नरहरी इगवे यांची आज दि. 30/6/21 रोजी द्वितीय पुण्यतिथी होती. पुण्यतिथीचा खर्च टाळून इगवे परिवाराने आधार वृद्ध भोजन सेवा केंद्राला मदत केली आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच सहभागी होणाऱ्या इगवे परिवाराकडून पुण्यतिथी निमित्त होणारा खर्च टाळून तीच रक्कम एखाद्या सत्कार्यात द्यावी असा स्तुत्य विचार केला. ह्या विचाराने त्यांनी 15 हजार रुपये डाळिंब येथे चालू असलेल्या आधार वृद्ध भोजन सेवा केंद्राला दिले. तसेच 5 हजार रुपये भूम येेथील कॅन्सर पीडित ग्रामसेवकाला देऊन समाजापुढे एक सत्कार्याचा आदर्श ठेवला आहे. इगवे परिवाराच्या या स्तुत्य कार्याचे सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी व सरपंच कुंभार, बाबा जाफरी सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी आभार व्यक्त करून कौतुक केले.
इगवे परिवाराचे हे कार्य कौतुकास्पद आहे. समाजाने त्यांच्या या कार्याचा आदर्श घ्यावा. बाबा जाफरी, सामाजिक कार्यकर्ते