वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्काराची नावे जाहीर करण्यात आली असून डिसेंबर महिन्यात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती ऍड. शितल चव्हाण यांनी दिली आहे.
प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुळज (ता. उमरगा) येथे दि. १६ डिसेंबर, २०१८ रोजी वाचनालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर वाचनालयाच्या ११ शाखा सुरु करण्याचा संकल्प केला गेला. त्यापैकी ९ शाखा सुरु देखील केल्या गेल्या. वाचनालयाच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. प्रा. शामराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी सन २०२१ च्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पुरस्काराचे वितरण डिसेंबरमध्ये वाचनालयाच्या वर्धापनदिनी करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेले विविध क्षेत्रातील मान्यवर खालीलप्रमाणे आहेत.
(१) मा. बाबा जाफरी – समाजरत्न
(२) मा. किशोर औरादे – कृषीरत्न
(३) मा. सौ. पुष्पलता पांढरे – शिक्षकरत्न
(४) मा. नितीन होळे – उद्योगररत्न
(५) मा. निळकंठ शाहूराज कांबळे – पत्रकाररत्न
(६) मा. प्रभाकर उळेकर – क्रिडारत्न
(७) मा. सौ. प्रभावती विरभद्रय्या स्वामी – ग्रंथसेवा