वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील बलसुर येथे जलस्वराज्य पाणीपुरवठा विहिरीसाठी २४ तास वीज पुरवठा डीपीचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रा. सुरेश दाजी बिराजदार साहेब यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१) करण्यात आले.
बलसुर गावातील नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी पाणीपुरवठा विहिरीकरीता २४ तास वीज पुरवठा होणे आवश्यक होते. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेशदाजी बिराजदार यांनी महावितरण विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परिणामी बलसुर येथील जलस्वराज्य पाणीपुरवठा विहिरीसाठी २४ तास वीज पुरवठा डीपी मंजूर झाला. या डीपीचे काम पूर्ण झाले असून अखेर मंगळवारी (दि.१) या डीपीचे उदघाटन करण्यात आले.यावेळी सहायक आभियंता शिंदगी साहेब, गुतेदार विजय तळभोगे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष सत्यनारायण जाधव, बलसुर गावच्या सरपंच जयश्रीताई नांगरे, उपसरपंच सुरेश वाकडे, ग्रामपंचायत सदस्य पवन पाटील, आयुब पटेल, दत्तू बनसोडे, दत्तू चव्हाण, वाघम्बर सरवदे, ग्रामसेवक पांढरे साहेब, माधव नांगरे, वसंत साखरे, बाळासाहेब बिराजदार, कवलजित बिराजदार, दादा पाटील, इंद्रजित मुडमे, बंटी शित्रे, अक्षय पाटील, बलभीम मिरगुडे, ईश्वर नांगरे, बळीराम नांगरे, महेबूब शेख, बनसोडे साहेब, मदार बडगिरे, मनोज बनसोडे, आनंद कांबळे, रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.