वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस प्रथम या संस्थेने शाळेसाठी दोन ४३ इंची एलईडी व इयत्ता पहिली ते सातवीसाठी सॉफ्टवेअर अभ्यासक्रम भेट दिले आहे. यावेळी प्रथम संस्थेचे प्रतिनिधी म्हणून दयानंद गायकवाड यांच्यासह दादा पाटील, शिवाजी जाधव, छाया जाधव, शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी, शिक्षक अनंत कानेगावकर, मोरवे खिजर, मल्लिकार्जुन कलशेट्टी सुनंदा निर्मळे व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. शाळेस दोन एलईडी व सॉफ्टवेअर भेट दिल्याबद्दल गावकऱ्यांनी प्रथम या संस्थेचे आभार मानले. प्रथम या संस्थेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी व विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण मिळण्यासाठी खूप महत्त्वाचे कार्य केले आहे अशी भावना शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केली आहे.