वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
देशातील वाढती महागाई, बोकाळलेली अर्थव्यवस्था, मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार करत असलेल्या दुर्लक्षीतपणामुळे लाखो मराठा युवकांचे करिअर बरबाद होत असताना कमालीची बाळगलेली शांतता याचा निषेध नोंदवत झोपलेल्या केंद्र सरकारला जागी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उमरगा तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, ग्रंथालय विभागाचे राज्य कार्यकारणी सदस्य जगदीश सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली उमरगा तालुक्यातील पदाधिकारी, शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. मा. पंतप्रधान मोदी यांना पेट्रोलचे भाव शंभरी पार केल्याबद्दल ‘नरेंद्र मोदींना शतकवीर म्हणून दहा हजार शुभेच्छा पत्र’ तसेच “एक पत्र मराठा युवकाच्या उज्वल भविष्यासाठी” या मोहिमेस सुद्धा आज पत्र पाठऊन प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी चालु केलेल्या या मोहिमेला पाठींबा दर्शवीला.
यावेळी युवक तालुकाध्यक्ष शमशोदिन जमादार यांच्यासह बाळू माशाळ, वाघम्बर सरवदे, गणेश वाडीकर, नंदू जगदाळे, जगदिश सुरवसे, रामदास माशाळ, समर्थ सुरवसे, संदीप माशाळ, तुकाराम माशाळ, पप्पू पवार, सांगपा पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या मोहीमेत महाराष्ट्रातील हजारो तरुणांनी आत्तापर्यंत उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवला आहे. या मोहिमेस राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
No Result
View All Result
error: Content is protected !!