वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जेवळी (दक्षिण) येथील महादेव कारभारी यांची शिवा लिंगायत युवक संघटना लोहारा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी लोहारा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. भाजपाचे लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते कारभारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, माजी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख जयेश सुर्यवंशी, मिलिंद सोनकांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.