मुरुम :
कै. माधवराव पाटील यांनी अविरतपणे केलेल्या शैक्षणिक कार्याचा गौरव व्हावा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सभोवतालच्या प्रश्नांची जाण निर्माण होऊन त्यांच्यामध्ये राष्ट्रीय, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक प्रश्नाबाबत सखोल ज्ञान व्हावे व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या उद्देशाने कै. माधवराव पाटील (काका) राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित करण्यात येते. मुरूम ता. उमरगा येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात शिक्षण महर्षी कै. माधवराव पाटील (काका) यांच्या स्मरणार्थ २१ वी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन सोमवारी (दि. १९) रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आली आहे. ‘ भारतीय राजकारणात प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे / नाही ‘ या विषयावर ही स्पर्धा असून राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्रविण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, सुधीर अंबर, संयोजन समितीचे समन्वयक प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. महेश मोटे, प्रा. दिनकर बिराजदार, डॉ. रवि आळंगे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ.राजेंद्र गणापूरे, डॉ. सायबण्णा घोडके, डॉ. भिलसिंग जाधव, डॉ. किरण राजपूत, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. जयश्री सोमवंशी आदिंनी केले आहे.