मुरूम :
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा हंगाम 2022-23 साठीचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापुराव पाटील यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर बुधवारी (दि.5) संपन्न झाला.
मुरूम येथील विठ्ठलसाई साखर कारखाना चेअरमन व माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून हंगामासाठी करावयाची संपूर्ण कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. तसेच पुरेसी वाहतुक यंत्रणा भरती करून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात मुबलक प्रमाणात ऊसाची उपलब्धता असून कारखान्याच्या संचालक मंडळाने 6 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कारखान्याचा मोळी पुजनाचा कार्यक्रम दि.10 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे. सदर हंगामात कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करून गाळपास आलेल्या ऊसास योग्य भाव देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी उमरगा जनता सहकारी बॅंकेचे चेअरमन शरण पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सादीक काझी, तसेच कारखान्याचे संचालक सर्वश्री विठ्ठलराव पाटील, केशवराव पवार, दिलीप पाटील, शरणाप्पा पत्रिके, संगमेश्वर घाळे, राजीब हेबळे, विट्ठलराव बदोले, माणिकराव राठोड, दत्तू भालेराव, शिवलींग माळी, अॅड.विरसंगप्पा आळंगे व तसेच प्रकाश आष्टे, प्रा. दिलीप गरूड, प्रा.अशोक सपाटे, नागनाथ पत्रिके, मल्लिनाथ दंडगे, युसुफ मुल्ला, पंडितराव टेकाळे, रशिद शेख, विकास हराळकर, धनराज मंगरूळे, गोविंद पाटील, अॅड.इनामदार, श्री. प्रमोद कुलकर्णी, श्री.सचिन पाटील, श्री.मदन पाटील, श्री.गुंडाप्पा भुजबळ, श्री.व्यंकटराव जाधव, श्री.महेश माशाळकर, श्री.योगेश राठोड, प्रा.शौकत पटेल, श्री.सुर्यकांत टेकाळे, श्री. प्रदीप दिंडेगांवे, श्री.बबन बनसोडे, श्री.रफीक तांबोळी, श्री.गुलाब राठोड, श्री.शंकरराव पाटील, अॅड.राहुल लोखंडे आदी मान्यवर कार्यकारी संचालक श्री.एम.बी.अथणी व कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.