वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्या टप्प्यातील परिवार संवाद दौर्याला उस्मानाबाद येथून २४ जून रोजी सुरुवात होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील हे मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि ४६ विधानसभा मतदारसंघ सलग ११ दिवस पिंजून काढणार आहेत. या दौऱ्याचा समारोप ४ जुलैला बीड येथे होणार आहे.
परिवार संवाद दौर्याचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु झाला होता. त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने यापुढील दुसरा टप्प्यातील दौरा स्थगित करण्यात आला होता. आता हाच दुसरा टप्पा मराठवाड्यात पुन्हा सुरू होत असून ११ दिवसात ४६ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील हे थेट संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड या आठ जिल्हयातील मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. या दौऱ्याचा कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करुन आखण्यात आला आहे. शिवाय याची रुपरेषा पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि यंत्रणांना कळवण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्हा दौरा खालीलप्रमाणे
No Result
View All Result
error: Content is protected !!