वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था कोराळ व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन किल्लारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत प्रशिक्षण व रोजगार मेळावा शनिवारी (दि.१७) येणेगुर येथे यशस्वीपणे पार पडला.
या मेळाव्याचे उद्घाटन लोककल्याणचे सचिव रवि दासमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोककल्याणचे अध्यक्ष विक्रम दासमे, भगत माळी, प्रथमचे सुमित कोथींबीरे, प्रशांत पोचापुरे, महेश कुंभार, रवी चौधरी, महेश माळी, धोंडिराम माळी, किशोर पुजारी, विद्यासागर गायकवाड, दत्ता कुंभार, बाबा माळवाले, अजय इगवे, सागर घोडके, अक्षय सुरवसे यांची उपस्थिती होती. या उपक्रमाअंतर्गत ८ वी ते पदवी अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना विविध क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण व रोजगार याविषयी माहिती देण्यात आली. तरुणांची बेरोजगारी लक्षात घेत लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास कोराळ, येणेगुर, महालिंगरायवाडी, सुपतगाव, नळवाडी अशा विविध गावांतील तरूणांनी मेळाव्यास उपस्थित राहुन नावनोंदणी करून घेतली. लोककल्याण चे अध्यक्ष विक्रम दासमे, भगत माळी, प्रथमचे सुमित कोथिंबीरे यांनी युवकांना सखोल मार्गदर्शन केले. प्रशांत पोचापुरे यांनी सुत्रसंचलन तर सचिव रवि दासमे यांनी आभार मानले. यावेळी गावातील व परिसरातील गावातील अनेक बेरोजगार तरूण उपस्थित होते.