Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

\’ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट\’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ – उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील करजगावचा मूळ रहिवासी असलेल्या उमेश गवळीच्या आवाजाची जादू

by admin
in आपला जिल्हा, ब्रेकिंग, महाराष्ट्र, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सध्या सोशल मिडीयावर \’ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट\’ हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. प्रत्येकाच्या मोबाईल वर हे गाणं आहे. संध्या आणि प्रनिकेत या दोन युवा गीत- संगीतकारांनी लिहिलेलं हे गाणं उमेश गवळी यांनी गायले आहे. या गीताच्या माध्यमातून आता हे कलाकार घराघरांत पोहोचले आहेत. पडद्यामागे राहिलेल्या या युवा गीतकारांचे गीत आणि संगीत लोकांच्या चांगलेच पसंतीस पडल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्तीकडे एक कला असते आणि ही कला मांडण्यासाठी सोशल मिडीया सारखा जबरदस्त प्लॅटफॉर्म आजच्या पिढीला मिळाला आहे. या माध्यमातून एखादा कलाकार सर्वदूर पोहोचू शकतो, याची प्रचिती नुकतीच आली आहे.
गाणं ऐकताच पाय थिरकायला लावणारे हे गीत अाज प्रत्येकाच्या ओठावर आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप स्टेटस आदी सर्वत्र याच गाण्याची चर्चा आहे. अवघ्या दोनच दिवसांत हे गीत त्यांनी लिहून पूर्ण केले. कोरोनाकाळात मरगळलेल्या मनाला ऊर्जा देणारं हे गीत आहे. यूट्यूबवर हे गीत अपलोड करताचं अवघ्या चारच दिवसांत या गीताने पाच मिलियन वीव्हर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. सध्याचा काळ सोशल मिडीयाचा आहे. अनेकजण आपले फोटो टाकून त्याला बॅकग्राऊंड म्युझिक देत ती पोस्ट सोशल मिडीयावर करत असतो. या सोशल मिडीयासाठी एखादं गाणं केलं तर हिट होईल असा विचार प्रनिकेत आणि संध्या यांनी केला आणि हे गीत लिहायला घेतले. आपल्या आवाजाचा वेगळेपण जपणारे या गीताचे मूळ गायक उमेश गवळी हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील करजगावचे रहिवासी. १९७२ साली मोठा दुष्काळ पडल्यानंतर त्यांचे वडील विनायक गवळी पुण्यात बिबेवाडी येथे स्थायिक झाले. उमेश हे व्यवसायाने कीबोर्ड वादक आणि गायक देखील आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते संगीत क्षेत्रात आहेत. वादन क्षेत्रातली ही त्यांची तिसरी पिढी आहे. यापूर्वी त्यांचे वडील आणि आजोबा हे देखील वादकच होते. त्यामुळे लहानपणीच त्यांना संगीत क्षेत्राची आवड निर्माण झाली. परिणामी अभ्यासात मन रमले नाही. म्हणून त्यांनी या क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय केला.
उमेश गवळी यांच्या गायनाची शैली, आवाजातील विविधता, माधुर्य, नाविन्य, संगीताचा अप्रतिम खजिना यामुळे त्यांच्या सुमधुर गाण्यांचा प्रभाव रसिकांवर दिसून येतो. \’तुला काय सोनं लागलाय का?\’ \’घुंगरु पैजणांच, दुसर्‍यांची बायको पटवली\’ एकापेक्षा एक मनाला निर्भेळ आनंद देणारी दमदार गाणी उमेश यांनीच गायली आहेत. ही सर्वच गाणी सुपरहिट ठरली आहेत. या सर्वच सुमधूर गीतातील बोल हे मनाला भिडणारे आहे. कारण दैनंदिन आयुष्यातील घडामोडींची वास्तविकता या गाण्यांमधून दिसून येते. याशिवाय उमेश हे पुण्यात \’लॉजिक\’ नावाचा म्यूझिक स्टुडिओ देखील चालवतात. गाणं हिट होताच त्यांना राज्यातून कौतुकासाठी फोन येत आहेत.

५० गाणी लिहिल्यानंतर मिळाले सुपर यश

या गीताचे युवा गीतकार आणि संगीतकार संध्या ज्ञानेश्वर केशे ही मूळची नाशिकची तर प्रनिकेत काकासाहेब खुने हा उस्मानाबाद शहरात राहतो. दोघांनी मिळून या गीताचे बोल रचून संगीतबद्ध केले. या दोघांनी मिळून ५० हून अधिक गाणी लिहिली आहेत. त्यापैकी \’ओ शेठ तुम्ही नादच केला थेट\’ हे गीत चांगलेच गाजले. उस्मानाबाद शहरात संध्या आणि प्रनिकेत दोघे मिळून प्रस्वर आज्ञा स्टुडिओ हा रेकॉर्डिंग स्टुडिओ चालवतात. या गाण्यातून या दोघांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या दोघांवर अाणि गायक यांच्यावर सतत कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Ad 2
Ad 1
Tags: ओ शेठतुम्ही नादच केलाय थेट
Previous Post

प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड यांची आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड

Next Post

लोककल्याण संस्थेच्या वतीने येणेगुर येथे मोफत प्रशिक्षण व रोजगार मेळावा संपन्न

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोककल्याण संस्थेच्या वतीने येणेगुर येथे मोफत प्रशिक्षण व रोजगार मेळावा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!