वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने सोमवारी ( दि.१३) वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण संवर्धन व्हावे, वृक्षारोपण चळवळ जोपासली जावी या उद्देशाने तालुक्यातील लोहारा खुर्द येथे सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळूंके, सह्याद्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप लोभे, उपाध्यक्ष प्रकाश भगत, सचिव भास्कर रसाळ, कोषाध्यक्ष गणेश पाटील, किसनराव रसाळ, सहदेव गोरे, दत्ता सुर्यवंशी, बालाजी सुर्यवंशी, हणमंत रसाळ, सचिन रणखांब, संतोष पाटील यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने पुढील काळात ५०० वृक्ष लागवड करण्याचा संकल्प संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश भगत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.