वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सामाजिक न्याय विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद, पंचायत समिती लोहारा व ग्रामीण रुग्णालय लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारा ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (दि.११) तालुकास्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १६६ दिव्यांगांची तपासणी करण्यात आली.या तालुकास्तरीय शिबिराचे उद्घाटन लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोंविद साठे,
मनोविकार तज्ज्ञ डॉ. राजेश नरवाडे, अर्थोपेडिक तज्ञ डॉ. विक्रम आळंगेकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.सुर्यवंशी, डॉ. मंगेश कुलकर्णी, समाज कल्याण विभागाचे दिव्यांग विभाग प्रमुख भारत कांबळे, डॉ. आर एम काळे, सायकाॅलाॅजिस्ट लक्ष्मण शेळके, विस्तार अधिकारी संजय ढाकणे, काळे, प्रा.बी.एम.बालवाड, निवासी दिव्यांग शाळा सास्तूरचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके, तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, जिल्हा उपाध्यक्ष शौकत अली मासुलदार, जिल्हा सरचिटणीस रियाज पठाण, दिव्यांग सेलचे कोषाध्यक्ष सागर पावले, सचिव श्रीमंत गरड, सदस्य किसन पवार, संघटनेचे सदस्य महमद आत्तार, अभिजित साळुंके, बालाजी सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.यावेळी समाज कल्याण विभागाचे वै.सा.का. भारत कांबळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोंविद साठे, निवासी दिव्यांग शाळा सास्तूरचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र युडीआयडी कार्डाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सास्तूर निवासी दिव्यांग शाळा व श्री शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी बाबूराव ढेले, रमाकांत ईरलापल्ले, राम बेंबडे, राजकुमार गुंडूरे, प्रविण वाघमोडे, विठ्ठल शेळगे, सूर्यकांत कोरे,निशांत सावंत, शंकरबावा गिरी, भिमराव गिर्दवाड, किरण मैंदर्गी, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, शौकत मासुलदार, महंमद आत्तार, बालाजी सुर्यवंशी,बिरू माने, श्रीमंत गरड, किसन पवार यांनी तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी दिव्यांगाची तपासणी करून घेण्यासाठी सहकार्य केले. या शिबिरात नेत्ररोग- ४२, अर्थोपेडिक -८२ मनोरूग्न -४२ असे एकूण १६६ दिव्यांगाची तपासणी करण्यात आली.