वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा ग्रामीण रुग्णालयात सोमवारी ( दि.१८) तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात तज्ञ डॉक्टरांकडून एकूण ३६७ नागरिकांची तपासणी करण्यात आली.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सोमवारी (दि.१८) लोहारा ग्रामीण रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य मोफत आरोग्य मेळावा घेण्यात आला. या आरोग्य मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख, शिवसेना गटनेत्या सारीका प्रमोद बंगले, राष्ट्रवादी गटनेते जालिंदर कोकणे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोविंद साठे, डॉ. महेश पाटील, डॉ. जगन्नाथ कुलकर्णी, रमाकांत जोशी, डॉ. दिपाली चिंचोळे, डॉ. मनिष सिन्हा आदींची प्रमुख उपस्थिती होती. या आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांसाठी सर्व सुविधा मोफत देण्यात आल्या. सर्व रोग मोफत तपासणी विशेष तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आली. यात हृदय रोग, मधुमेह, रक्तदाब, मेंदुचे आजार, फुफ्फुसाचे आजार, कॅन्सर, गरोदर माता व स्त्री तपासणी लहान मुलांचे आजार, किडनी आजार, मोतीबिंदू, त्वचा रोग, गुप्त रोग, कान-नाक, घसा आजार, अस्थिरोग, एच.आय.व्हि. तपासणी, क्षयरोग, दंतरोग, कुष्ठरोग आदी आजाराची तपासणी करण्यात आली. तसेच मोफत रक्त, लघवी, एक्स रे व ई.सी.जी. व गरजु रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा फुले योजने अंतर्गत करण्यात येणार आहे. या मेळाव्यात २०८ पुरुष व १५९ स्त्री असे एकूण ३६७ जणांची तपासणी करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी सोपान अकेले, अभिमान खराडे, अदिंनी भाषणे केली. यावेळी शिवसेना युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या वतीने मेळाव्यात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमाकांत जोशी व सुत्रसंचालन अच्युत आदटराव यांनी तर डॉ. दस्तगीर मुजावर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास अभिमान खराडे, न.प.चे अर्थ व बांधकाम समिती सभापती गौस मोमिन, नगरसेवक अविनाश माळी, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, के.डि.पाटील, बाळासाहेब कोरे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, डॉ. संदिप उपळे, डॉ. इरफान शेख, डॉ. राजु गायकवाड, डॉ. जितेंद्र मेटे, डॉ. दिपाली शिंदे, डॉ. विद्या बनसोडे, उज्वल कारभारी, डॉ. दस्तगीर मुजावर, पल्लवी गायकवाड, खंडु शिंदे, अंगद गिराम, प्रविण कांबळे, आलाबक्ष बागवान, उज्वल कारभारी, तुकाराम गायकवाड, दत्ता बोर्डे , बप्पा वाघमारे, अमोल वाघमारे, एम.जी.सिरसाठ, स्वप्नील कटारे, योगेश गायकवाड, पुजा घोडके, अंजु साळुंखे, वैशाली लोंढे, सुनिता स्वामी, आदिनाथ फुलसुंदर, यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, परिसरातील रुग्ण व नागरिक उपस्थित होते.