वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
वाढत्या पेट्रोल डिझेल व खतांच्या दरवाढीचा निषेध करत ही दरवाढ कमी करण्यात यावी अशी मागणी लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोहारा तहसीलदार मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोमवारी ( दि. १७) निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, देशात पेट्रोल डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. पेट्रोल तर शंभर रुपयांच्या वर गेले आहे. त्यात आणखी एक संकट निर्माण झाले आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. जे डीएपी खत ११८५ रुपयांना मिळत होते त्याची किंमत आता १९०० रुपये झाली आहे. याप्रमाणे अन्य खतांच्याही किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही या दरवाढीचा निषेध करत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे तसेच ही दरवाढ कमी करावी व शेतकरी, सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. तहसीलदार संतोष रुईकर यांना हे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल बुरटूकणे, माजी नगरसेवक गगन माळवदकर, शहराध्यक्ष आयुब शेख, बहादुर मोमीन, नवाज सय्यद, बालाजी मेनकुदळे, संजय जाधव, सचिन रनखांब, स्वप्निल माटे उपस्थित होते.