वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
देशात सध्या हनुमान चालीसा, भोंग्यासारखे वेगळेच विषय समोर आणले जात आहेत. या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा काही जणांचा उद्देश आहे. परंतु या देशात लोकनेते शरद पवार यांनी शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार एवढ्या ताकतीने रुजवलेत की जोपर्यंत हे विचार या मातीमध्ये जिवंत आहेत तोपर्यंत या ठिकाणी दंगली होऊच शकत नाहीत असे प्रतिपादन शिवाव्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले आहे.लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील तावशिगड येथे सोमवारी (दि. १६) महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध शिवाव्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान झाले. तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात शिवाव्याख्याते यशवंत गोसावी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तावशिगडच्या सरपंच मधुमती पाटील ह्या होत्या. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, धनेश्वरी शिक्षण समूहाचे प्रतापसिंह पाटील, वक्ता प्रशिक्षण विभागाचे राज्य उपाध्यक्ष तुषार वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, महिला तालुकाध्यक्षा शरीफा सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना शिवाव्याख्याते गोसावी म्हणाले की, महामानवांनी सर्व समाजातील लोकांसाठी काम केले आहे. त्यामुळे आपण एकमेकांविरुध्द लढत बसण्यापेक्षा आपल्या महामानवांनी जे विचार दिले आहेत ते आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जर महामानवांनी सर्वांसाठी काम केले तर आपण आपल्या जातीपुरताच का विचार करत आहोत असा प्रश्न उपस्थितांना केला. ते पुढे म्हणाले की, सध्या देशात काही लोकांकडून जाणीवपूर्वक जातीजातीत द्वेष निर्माण करून एकमेकांविरुद्ध माथी भडकविण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे. परंतु आपण त्याला बळी पडू नका. या देशाला सध्या पुरोगामी विचारांची गरज आहे. आणि माझ्या मते सद्यस्थितीत पुरोगामी विचार जोपासणारा एकमेव नेता म्हणजे खा. शरद पवार आहेत. सध्या त्यांच्या विचारांची आपल्याला गरज आहे असे प्रतिपादन शिवाव्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले आहे.यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठाभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी औरंगाबाद येथील कृषिभूषण विजय अण्णा बोऱ्हाडे, तालुक्यातील सास्तुर येथील प्रगतशील शेतकरी गोविंदराव पवार, दाळिंब येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी, सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी व टीव्ही ९ चे उस्मानाबाद प्रतिनिधी संतोष जाधव यांना मराठाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ज्या पद्धतीने खा. शरद पवार साहेबांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून सोबत काम केले. अगदी त्याच पद्धतीने तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करून सामाजिक सलोखा राखण्याचे एक स्तुत्य काम केल्याबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमात सालेगाव येथील मानसी साळुंके या चिमुकलीने छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विचार व्यक्त केले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी मानसीचे कौतुक केले.या कार्यक्रमासाठी लोहारा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आयुब शेख, तालुका उपाध्यक्ष सलमान सवार, विठ्ठल बुरटूकणे, प्रशांत सोमवंशी, तालुका सचिव वैजिनाथ कागे, ब्रम्हा सोमवंशी, सयाजी शिंदे, भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, प्रवीण पाटील, महेश स्वामी, युवराज कोकाटे, राजपाल पाटील, मंगेश पाटील, गोविंदराव साळुंके, प्रकाश भगत, दयानंद थोरात, लक्ष्मण बिराजदार, किसान सेलचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, शेखर आंबेकर, नागुरचे सरपंच गजेंद्र जावळे, नरदेव कदम, उमरगा युवक तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, उमरगा-लोहारा विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील, अजित जाधव यांच्यासह तावशिगड व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी केले. सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी तर वक्ता सेलचे तालुकाध्यक्ष सचिन रणखांब यांनी आभार मानले.