वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था, उस्मानाबाद , कौशल्या फाऊंडेशन आणि स्माईल फॉर ऑल यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील तोरंबा गावातील १५ गरीब, गरजू, विधवा, परितक्ता कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
मागील दीड वर्षांपासून सर्वत्र कोविड चा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. गावातील अपंग, निराधार लोकांना या संकट काळात आधार मिळावा यासाठी स्वयंम शिक्षण प्रयोगच्या तालुका व्यवस्थापक शीेतल रणखांब, शिल्पा वेलदोडे, लिडर बबिता रणखांब यांनी पुढाकार घेऊन मदत स्वरूपात किराणा किटचे वाटप करण्यात करण्याचे ठरवले. त्यानुसार तोरंबा गावातील १५ गरीब, गरजू, विधवा, परितक्ता कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. सरपंच वर्षाताई चव्हाण, उपसरपंच सप्नील चव्हाण, कृषी सहाय्यक किशोर गायकवाड, ग्रामसेवक एस.एस. भिसे यांच्या हस्ते हे किट वाटप करण्यात आले. कोरोनाच्या या संकट काळात अशा प्रकारे मदत मिळाल्यामुळे सदरील कुटुंबातील महिलांनी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या संचालक प्रेमा गोपालम, प्रोजेक्ट डायरेक्टर उपमन्यू पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर तबसुम मोमीन यांचे आभार मानले. यावेळी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या लिडर बबिता रनखांब, अंगणवाडी कार्यकर्त्या आदी उपस्थित होत्या.
No Result
View All Result
error: Content is protected !!