वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लहान मुलांना घडविण्यासाठी शाळेत स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक असते. यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. तसेच मुले या स्पर्धेच्या युगात चांगले यश मिळवू शकतात. विद्यामाता इंग्लिश स्कुल मध्ये अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते ही कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन औशाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी केले आहे.
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुल मध्ये रविवारी (दि.१२) सुंदर माझी शाळा व पालक मेळावा पार पडला. या कार्यक्रमात तहसीलदार सूर्यवंशी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य दिपक जवळगे हे होते. यावेळी शेतकरी विकास संस्थेचे संचालक किशोर साळुंके, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, राजकुमार काकडे, नागनाथ पवार, मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे, रंजना हासुरे, श्रीराम पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गायक श्रीराम पोतदार यांच्या गितगायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांनी केले.
या कार्यक्रमास नितीन सूर्यवंशी, पंकज बाबर, धनंजय पोतदार, गोवर्धन आलमले, सिद्धेश्वर बिडवे, श्रीकांत वडजे यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधीर येनेगुरे यांनी तर मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांनी आभार मानले.