वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भातागळी येथे सम्राट ग्रुपच्या वतीने भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भातागळी गावचे उपसरपंच हणमंत कारभारी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच तथा ग्रा.पं.सदस्य तानाजी आनंदगावकर, ग्रा.पं.सदस्य तथा राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे लोहारा तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष गौतम गायकवाड, उपाध्यक्ष पंडित मस्के, सचिव नेताजी गायकवाड, सहसचिव सुनील मस्के, कोषाध्यक्ष उमाकांत मस्के, मिरवणूक प्रमुख करण गायकवाड, दिपक गायकवाड, कैलास इंगळे, राहुल चव्हाण भीम मस्के, बालाजी गायकवाड, महादेव गायकवाड, कडप्पा गायकवाड, रमेश मस्के आदी उपस्थित होते.