Vartadoot
Monday, May 4, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान द्या अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार – राष्ट्रवादी काँग्रेसने दिला निवेदनाद्वारे ईशारा

admin by admin
17/09/2022
in कृषी, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे ईतर तालुक्याला जी मदत देण्यात आली आहे त्याप्रमाणे लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.१६) तहसीलदार संतोष रुईकर यांना हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारकडून अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या यादीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ९० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्या अनुदान यादीतून लोहारा तालुका वगळण्यात आला आहे. लोहारा तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा जास्त १५० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे येथील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. तसेच शंखी गोगलगायीमुळेही अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याही अनुदानातून लोहारा तालुका वगळण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. उमरगा व लोहारा तालुक्याचे आमदार एकच असताना मदत मात्र उमरगा तालुक्याला मिळते. व लोहारा तालुका त्यातून वगळला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.
तरी मंत्री महोदयांना विनंती आहे की, ज्या प्रमाणे इतर तालुक्याला मदत झाली आहे. त्याच प्रमाणे लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळाली पाहिजे. जर सदरील मदत येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांना मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना पाटील, नगरसेवक जालिंदर कोकणे, राजेंद्र कदम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, प्रकाश भगत, सुशांत शिंदे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अतिवृष्टी अनुदाननिवेदनराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

लोहारा (खुर्द) येथील तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी अनिल इंगळे तर उपाध्यक्ष पदी श्रीहरी सूर्यवंशी यांची निवड

Next Post

हायस्कुल लोहारा शाळेतील विद्यार्थ्यांनी मारली बाजी – किंग कोब्रा गणेश मंडळ आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

Related Posts

हायस्कूल लोहारा शाळेच्या वार्षिक अंकाचे विमोचन
लोहारा तालुका

हायस्कूल लोहारा शाळेच्या वार्षिक अंकाचे विमोचन

03/05/2026
महाराष्ट्र दिनानिमित्त लोहारा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर
लोहारा तालुका

महाराष्ट्र दिनानिमित्त लोहारा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर

03/05/2026
जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान
लोहारा तालुका

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान

25/04/2026
सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

14/04/2026
लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

12/04/2026
वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम
लोहारा तालुका

वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

12/04/2026
Next Post

हायस्कुल लोहारा शाळेतील विद्यार्थ्यांनी मारली बाजी - किंग कोब्रा गणेश मंडळ आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's