वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुका विधी सेवा समिती, पंचायत समिती लोहारा, निवासी दिव्यांग शाळा,सास्तूर, नगर पंचायत,लोहारा व श्री शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी (दि.१३) बालमजुरी निर्मूलन या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.
आझादी का अमृतमहोत्सवा निमित्त दिनांक २ आक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत तालुकाभर विविध जनजागरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून बुधवारी (दि.१३) लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळा व श्री शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, सास्तूर येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी ‘बालमजूरी निर्मूलन’ विषयावर आपल्या बहारदार अभिनयाच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना बालमजूरी या समस्येचे महत्व पटवून दिले.या पथनाट्यामध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या गौरव करदोरे, गायत्री सुर्यवंशी, राधिका मरे, भाग्येश इस्लामपूरे, महेश पवार या दिव्यांग कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून लोहारा वासियांच्या मनावर छाप पाडली. तसेच सहकलाकार प्रज्वल सुतार, कु. सुमित्रा सोमवंशी, कु .नागीण सोलापूरे, संदेश सोनकांबळे, सुर्या शिंदे यांनीही दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, विस्तार अधिकारी विनोद पवार, सहाय्यक अधिक्षक दिवाणी न्यायालय लोहारा सी.के.कदम, नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी मनोज खराडे, श्रीमती एस.व्ही. भोसले दिवाणी न्यायालय, लोहारा, श्री शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र,सास्तूरचे प्राचार्य बी.एम.बालवाड, निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे आदींची उपस्थिती होती. यावेळी पर्यावरण संवर्धना संदर्भात कु. दिपाली घोसले, कु. सोनाली बेळे, कु. स्वप्नाली पूजारी या दिव्यांग विद्यार्थिनींनी सुरेख सादरीकरणातून स्वच्छतेचे व पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. सदर दोन्ही पथनाट्याचे दिग्दर्शन व संगीत प्रविण वाघमोडे यांनी केले. तबला साथ अनिल लोहार यांनी केली. वेशभूषा शंकरबावा गिरी, प्रयागताई पवळे, सुनिता कज्जेवाड यांनी केली. ज्ञानोबा माने, दगडू सगर, निशांत सावंत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, व आभार प्रदर्शन निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रविण वाघमोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी लोहारा शहरातील नागरिक उपस्थित होते.