वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तूर ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ई- लर्निंंग साहित्य देण्यात आले आहे. तसेच गावातील सर्व अंगणवाडीसाठी खेळणी, गॅस शेगडी इ. साहित्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सास्तूर येथे संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी जि.प.सदस्या शितल राहूल पाटील , सास्तूर चे सरपंच यशवंत कासार , राजवर्धन पाटील, फझल कादरी जयप्रकाश कोकणे, शरीफ मुल्ला, सर्व ग्रा.प. सदस्य, ग्रामसेवक डी. आय. गोरे , जि.प. प्रशालेचे मुख्याध्यापक कुमार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात सास्तूर ग्रा.पं. च्या वतीने सास्तूर गावातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील माने, मनोज स्वामी, गणेश वाघमारे, व्यंकट क्षीरसागर, मुक्ता माळी यांचा गौरवपत्र देवून सत्कार करण्यात आला.
सास्तूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडुनही आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच यशवंत कासार यांनी केले. सूत्रसंचालन शितलकुमार वाघमारे यांनी तर राजपुत्र पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी, जि.प. प्रशालेचे शिक्षक व विद्यार्थी, गावातील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.