वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील सप्तशृंगी दांडिया ग्रुपच्या वतीने रविवारी (दि. २) शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लोहारा शहरातील सप्तशृंगी दांडिया ग्रुपच्या वतीने या दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुंदर मी आणि माझी दांडिया, ग्रुप दांडिया, संगीत खुर्ची, वैयक्तिक दांडिया आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यात जवळपास ३०० महिला व मुलींनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी आकांशा चौगुले, ज्योती चौगुले, नगराध्यक्षा वैशाली खराडे, पाणीपुरवठा सभापती मयुरी बिराजदार, नगरसेविका संगीता पाटील, आरती कोरे, आरती गिरी, नाजमीन शेख, मीरा फुलसुंदर, योगिता वचने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली रसाळ व बालाजी मक्तेदार यांनी केले. प्रास्ताविक अमित बोराळे यांनी केले. सुंदर मी आणि माझी दांडिया या स्पर्धेमध्ये डॉ. रूपाली श्रीगिरे यांनी प्रथम, प्रणाली वाकळे यांनी द्वितीय तर अंजली पटवारी यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
महिला ग्रुप दांडिया स्पर्धेत स्वामी समर्थ ग्रुपने प्रथम तर शांभवी दांडिया ग्रुपने द्वितीय क्रमांक मिळवला. वैयक्तिक दांडिया (महिला) स्पर्धेमध्ये मयुरी बिराजदार यांनी प्रथम, आरती नरुणे द्वितीय तर सरोजा गायकवाड यांनी तृतीय क्रमांक मिळवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सप्तशृंगी दांडिया ग्रुपच्या ललिता कांबळे, जोत्स्ना रोडगे, भाग्यश्री कुंभार, सविता जाधव, मनीषा राठोड, आकांक्षा कांबळे यांच्यासह मार्गदर्शक अमित बोराळे व बालाजी मक्तेदार यांनी परिश्रम घेतले. सविता जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.