वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
देशाला स्वतंत्र होवून 75 वर्ष पूर्ण होत असल्याने सर्व देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या वतीने गुरुवारी (दि. ११) शहरात भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन तहसीलदार संतोष रुईकर व शिवसेना नेते माजी नगरसेवक अभिमान खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी भारतमाता, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, ए.पी. जे. अब्दुल कलाम, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा, स्वच्छ भारत – स्वस्थ भारत, समृध्द भारत – संपूर्ण भारत , वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.
याप्रसंगी तहसीलदार संतोष रुईकर, लोहारा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, अभिमान खराडे, अविनाश माळी, अमोल बिराजदार, जालिंदर कोकणे, जनकल्याण समितीचे शंकर जाधव, जगदिश लांडगे, बाळासाहेब पाटील, श्रीनिवास माळी, कमलाकर शिरसाट, भगवान पाटील, भागवत गायकवाड, रमेश वाघुले, स्कुलचे मुख्याध्यापक शहाजी जाधव, संचालिका सविता जाधव, सिद्धेश्वर सूरवसे, हारूण हेड्डे, व्यंकटेश पोतदार, सोमनाथ कुसळकर, मीरा माने, संचिता बाचपल्ले, माधवी होगाडे, संतोषी घंटे, शिवानी बिडवे, चांदबी चाऊस, दीप्ती पांचाळ यांच्यासह पालक व विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते.